Join us

‘आरकॉम’ने जमविले 4,800 कोटी

By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST

भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लि. अर्थात आरकॉमने गुंतवणूकदार संस्थांना शेअर विक्री करून 4,800 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे.

नवी दिल्ली : भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लि. अर्थात आरकॉमने गुंतवणूकदार संस्थांना शेअर विक्री करून 4,800 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे. 
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरच्या काळातील ही सर्वात मोठी भांडवल उभारणी ठरली आहे. कंपनीशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रंनी सांगितले की, कंपनीला एकूण 12,000 कोटी रुपयांचे अभिदान मिळाले आहे. गुंतवणूकदार संस्थांनी एकूण 80 कोटी डॉलरचे म्हणजेच 4,800 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. याशिवाय कंपनी आपल्या संस्थापकांना वॉरंट जारी करून 1,300 कोटी रुपये उभे करणार आहे. 
अलीकडे कंपनीच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणात वाढला होता. गेल्या 4 वर्षात कंपनीवरील कर्ज 40,177.6 कोटी रुपये झाले होते. नवे भांडवल मिळाल्यामुळे कंपनीला कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल. 
आरकॉम ही अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबत बोलण्यास नकार दिला. तथापि, सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2014 च्या अखेरीस कंपनीच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा 401.78 अब्ज रुपये इतका होता. हे कर्ज कंपनीला होणा:या नफ्यापेक्षा 5 पट जास्त आहे. नोंदणीकृत भारतीय कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर्जबाजारी कंपनी अशी या कंपनीची ओळख झाली होती. 
केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराची स्थिती सुधारली आहे. गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे गुंतवणूकदार संस्था बाजारात गुंतवणूक करीत आहेत. याचा लाभ आरकॉमने घेतला आहे. 
आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अनीस श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतीय कंपन्यांसाठी वाढीची बॅलन्सशीट राखणो आवश्यक ठरले आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. याचाच अर्थ कंपन्यांची शेअर विक्री सुरूच राहील. सध्याच्या स्थितीत विदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, 
असे दिसते. हा कल येणा:या 
काळात कायम राहील, अशी स्थिती आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात होती. आशियातील तिस:या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील विदेशी गुंतवणुकीवर मंदीचा परिणाम झाला होता. हे मळभ आता दूर होत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)