Join us

आरसीईपी देशांसोबतच्या व्यापारासाठी

By admin | Updated: September 28, 2015 01:47 IST

भारत, चीन व जपानसह जगातील १६ देशांचे प्रमुख उद्योगपती भविष्यात परस्परांच्या व्हिसामुक्त व्यापार दौऱ्यावर येऊ शकतील. यामुळे विविध देशांतील

व्हिसामुक्त यात्रेस सैद्धांतिक मंजुरीनवी दिल्ली : भारत, चीन व जपानसह जगातील १६ देशांचे प्रमुख उद्योगपती भविष्यात परस्परांच्या व्हिसामुक्त व्यापार दौऱ्यावर येऊ शकतील. यामुळे विविध देशांतील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. गृहमंत्रालयाने या महत्त्वाकांक्षी योजनेस सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) या प्रस्तावित व्यापार कराराचे सदस्य देश येत्या १२ ते १६ आॅक्टोबरदरम्यान दक्षिण कोरियाच्या बुसान येथे होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा करणार आहेत. १६ सदस्यीय आरसीईपीमध्ये १० आसियान देश आणि त्यांचे व्यापारी भागीदार भारत, दक्षिण कोरिया, जपान, चीन, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.प्रस्तावांतर्गत आशिया-पॅसिपिक आर्थिक सहकार्य परिषदेच्या (अपेक) धर्तीवर आरसीईपीच्या सदस्य देशांच्या उद्योगपतींना एक विशेष व्यापार यात्रा कार्ड जारी केले जाईल. याद्वारे उद्योगपती परस्परांच्या देशात व्हिसामुक्त अल्पकालीन दौरे करू शकतील. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आम्हाला वाणिज्य मंत्रालयाकडून एक प्रस्ताव मिळाला आहे. सैद्धांतिकदृष्ट्या हा व्यवहार्य असल्याचे आम्ही कळविले आहे. (वृत्तसंस्था)मात्र अंतिम मंजुरीसाठी अधिक स्पष्ट व विस्तृत योजना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये आरसीईपी चर्चा सुरू झाली होती. या १६ देशांचा जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे २५ टक्के वाटा आहे.