Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयला हवी आता अनुदान कपात

By admin | Updated: January 20, 2015 02:25 IST

गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे; मात्र परिस्थितीत जरी असाच सुधार दिसून आला

मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे; मात्र परिस्थितीत जरी असाच सुधार दिसून आला तरी आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत दरकपात न करण्याचे संकेत शिखर बँकेने दिले आहेत. त्यामुळे मार्चनंतर दरकपातीला मुहूर्त लाभेल.मे २०१३ नंतर प्रथमच गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केली. तब्बल पावणेदोन वर्षांनी दरकपात झाल्यामुळे बाजारामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आगामी पतधोरणातही आणखी व्याजदर कपात होण्याची आस उद्योग जगताला लागली आहे. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय घट होऊन हे दर प्रति बॅरल ४५ अमेरिकी डॉलरच्या पातळीवर आले आहेत.भारतासाठी ही जमेची बाब आहे. यामुळे चालू खात्यातील वित्तीय तूटही कमी होण्यास मदत होणार आहे. आता केंद्र सरकारने कच्च्या तेलावर आधारित इंधनांवरील अनुदान बंद करण्यासाठी उत्तम वेळ असल्याची चर्चा आहे. किंबहुना, रिझर्व्ह बँकेनेही अप्रत्यक्षपणे तशी अपेक्षा वर्तविली आहे. अनुदानात कपात केली अथवा थेट बंद केली तरी त्याचा ग्राहकांवर फारसा बोजा पडणार नाही.