Join us

आरबीआय आणणार २०० रुपयांच्या नोटा?

By admin | Updated: April 5, 2017 04:20 IST

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया जून महिन्यानंतर २०० रुपयांच्या नोटा आणण्याचा विचार करत आहे

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया जून महिन्यानंतर २०० रुपयांच्या नोटा आणण्याचा विचार करत आहे. गत महिन्यात याबाबत एक बैठक झाली. या वेळी हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून २०० रुपयांच्या नोटांना मंजुरी मिळाल्यानंतर जूननंतर या नोटांची छपार्ई सुरू होऊ शकते. काही वेबसाइटनेही याबाबत माहिती दिली आहे. गत महिन्यात रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने दहा रुपयांच्या प्लास्टिक नोटांची ट्रायलही सुरू केली आहे. कारण, सर्वसाधारण नोटांपेक्षा प्लास्टिक नोटा दीर्घकाळ चालतात. नोटाबंदीनंतर देशाच्या अनेक भागात नोटांची टंचाई जाणवली होती. विशेषत: १०० व ५०, २०, १० रुपयांच्या नोटांची टंचाई जाणवली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. तथापि, बाजारपेठेत आणि ग्रामीण भागातील बाजारपेठेत व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात १०० रुपये व त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांचा अधिक वापर होतो. दरम्यान, २०० रुपयांच्या नव्या नोटांना सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच या नोटा चलनात दाखल होणार आहेत. >नोटांचे नवे रूपनोटाबंदीच्या निर्णयानंतर २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात दाखल झाल्या आहेत. आता २०० रुपयांच्या नोटांच्या निमित्ताने नोटांचे आणखी एक नवे रूप समोर येणार आहे. १००० रुपयांच्या नोटा नव्याने दाखल करण्यात येणार असून यात सुरक्षा सुविधा वाढविण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात येत होते. पण, आरबीआयने अशी शक्यता फेटाळून लावली आहे.