Join us  

RBIनं लक्ष्मी विलास बँकेवर एक कोटी अन् सिंडिकेट बँकेला ठोठावला 75 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:30 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेनं लक्ष्मी विलास बँक आणि सिंडिकेट बँकेला मोठा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेनं लक्ष्मी विलास बँक आणि सिंडिकेट बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. लक्ष्मी विलास बँकेला 1 कोटी तर सिंडिकेट बँकेला 75 लाख दंडाच्या स्वरूपात भरावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर लक्ष्मी विलास बँक आणि सिंडिकेट बँकांच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी विलास बँकेचे शेअर्स 52 आठवड्याच्या खालच्या स्तरावर गेले होते. तर सिंडिकेट बँकेचे शेअर्सही घसरले. इन्कम रिकग्निशन अँड असेट क्लासिफिकेशन(आयआरएसी)च्या नियमांचा भंग केल्यानं ही कारवाई झाली आहे.  

तर दुसरीकडे  व्यावसायिकाविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे तसेच गैरमार्गाने त्याची फसवणूक करण्याच्या तक्रारीबाबत कोटक महिंद्रा बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला केली आहे. बागला यांनी याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडे कोटक यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी गृह मंत्रालयाकडे बाराखंबारोड पोलीस स्टेशनमधील तत्कालीन सहा पोलिसांच्या विरोधातही तक्रार केली आहे.या पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेच्या अधिका-यांच्या साथीने गैरमार्गाने आपल्यावर कारवाई केल्याची त्यांची तक्रार आहे. डॉ. संतोष कुमार बागला यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वीरेंद्र कुमार शर्मा यांनी आपली मालमत्ता कॉग्नंट इएमआर सोल्युशन्स लि. या कंपनीला दीर्घ लीजने भाडेतत्त्वावर दिली होती.