Join us  

२ हजारांच्या नाही ५०० रुपयांच्या नोटेने RBI चं वाढवलं टेन्शन! अहवालात झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 2:56 PM

आरबीआयला वर्ष २०२२-२०३ या वर्षात २ हजार रुपयांच्या ९,८०६ बनावट नोटा मिळाल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे दिवशी २ हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारसाठी २००० रुपयांच्या नोटा आणि ५०० ​​रुपयांच्या नोटा अडचणीच्या ठरत आहेत. आरबीआयने आपल्या अहवालात याची पुष्टी केली आहे. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात माहिती दिली आहे की आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५०० रुपयांच्या सुमारे ९१,११० बनावट नोटा सापडल्या होत्या. अहवालात असे म्हटले आहे की २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्रात जप्त करण्यात आलेल्या एकूण बनावट भारतीय चलनी नोटांपैकी ४.६ टक्के रिझर्व्ह बँकेत आणि ९५.४ टक्के इतर बँकांमध्ये आढळून आल्या आहेत.     

'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा

सेंट्रल बँकेने असेही सांगितले की २०२३ या आर्थिक वर्षात १०० रुपयांच्या ७८,६९९ बनावट नोटा आणि २०० रुपयांच्या २७,२५८ बनावट नोटाही सापडल्या. आरबीआयला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९,८०६ बनावट २००० रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत. केंद्र सरकारने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याची घोषणा केली होती. २०१६ मध्ये चलनात आणलेले २००० रुपये मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकांना या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २० रुपयांच्या नवीन डिझाईनच्या बनावट नोटांचे प्रमाण ८.४ टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी, नवीन डिझाइनच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०,१०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या चलनात घट झाली आहे. १० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत ११.६ टक्क्यांनी घट झाली आहे. १०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १४.७ टक्के आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत २७.९ टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनोटाबंदी