Join us  

RBI नं 'या' बँकेचा परवाना केला रद्द, आता ग्राहकांवर काय परिमाण होणार? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:06 PM

RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) गोवास्थित मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय जारी केला आहे.

RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) गोवास्थित मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे ही बँक आता कोणत्याही बँकिंग व्यवसाय करू शकत नाही. आरबीआयकडून गोवा रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटीव्ह सोसायटीला याप्रकरणी तातडीनं आदेश जारी करून एक लिक्विडेटर नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. ( RBI cancels licence of Madgaum Urban Cooperative Bank in goa)

गेल्या काही महिन्यांत रिझर्व्ह बँकेनं सुमारे डझनभर बँकांचे परवाने रद्द केले आहेत. ज्या बँकांची कार्यपद्धती चुकीची आणि आरबीआयच्या नियमानुसार होत नसल्याचं आढळून आलं आहे अशा बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. बँकेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार मडगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे ९९ टक्के ठेवीदार एक रुपया देखील गमावणार नाहीत. त्यांना विम्याच्या खाली ठेव रक्कम दिली जाईल. 

मडगाव को-ऑपरेटीव्ह बँकेकडे पुढील व्यवहारासाठी आणि कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पुरेसे भांडवल शिल्लक राहिलेले नाही. तसंच भविष्यातील उत्पन्नाबाबत नियोजन देखील बँकेनं केलेलं नाही, असा ठपका आरबीआयनं बँकेवर ठेवला आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रगोवा