Join us  

हौसेला मोल नाही, गौतम सिंघांनीयांनी विंटेज कार्सच्या आवडीसाठी घेतली रिस्क; ३२८ कोटींचा टॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 12:17 PM

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. भारतीय उद्योजक गौतम सिंघानिया हे त्याचंच उदाहरण आहेत.

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. भारतीय उद्योजक गौतम सिंघानिया हे त्याचंच उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या कार्सच्या हौसेसाठी कोट्यवधी रुपये स्वाहा केलेत. पैशांना कायमच महत्त्व देणाऱ्या सिंघानिया यांना आपल्या विंटेज कार्सच्या आयातीसाठी सरकारला दंड आणि व्याजापायी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार आहेत. ही किंमतही कमी नाही.

११००० कोटी रुपयांची नेटवर्थ असलेले गौतम सिंघानिया रेमंड समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते कायमच आपल्या महागड्या लाईफस्टाईलसाठी चर्चेत असतात. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार गौतम सिंघानिया यांनी गेल्या काही वर्षात निरनिराळ्या देशातून १४२ कार्स इम्पोर्ट केल्या. आयातीसाठी आवश्यक असलेली शुल्क मात्र त्यांनी भरली नाहीत. अशात आता डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनं गौतम सिंघानिया यांच्या नावे एक नोटीस जारी केली आहे. त्यांना लवकर ही रक्कम भरण्यास सांगण्यात आलंय. त्यांना एकूण ३२८ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

म्युझियम खुलं होणार१४२ कार्समधून १३८ कार्स विंटेज आहेत आणि अन्य चार कार्स आर अँड डी साठी मागवण्यात आल्या आहेत. याचं आयात शुल्क २२९.७२ कोटी रुपये आहे आणि त्यावर १५ टक्के दंडही ठोठावण्यात आलाय. अशाप्रकारे त्यांना एकत्र मिळून ३२८ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यातील काही कार्स मोठ्या बोली लावून खरेदी करण्यात आल्यात. या सर्व कार्स एकत्र करुन म्युझियम तयार करावं अशी गौतम सिंघानिया यांची इच्छा आहे. या म्युझियमसाठी त्यांनी जेके हाऊसची निवड केली आहे. त्यांच्या या यादीत विंटेज कार्ससह अनेक लक्झरी कार्सही सामील आहेत.

टॅग्स :रेमंड