रत्नसुंदरवाणी... परिवर्तन घडविण्याची क्षमता पर्युषण पर्वात
By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST
औरंगाबाद : भुंगा किंवा भ्रमर हा फुलांमधील रस शोषून घेताना फुलाला हानी पोहोचवीत नाही. त्याला कचर्यावर जरी ठेवले तरी तो त्यातून फूल शोधून काढेल. प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये मधुकरवृत्ती आणली पाहिजे. जग आणि स्वत:कडे पाहताना मनामध्ये आदरभाव आणि आत्मसन्मान हवाच. आत्मसन्मानाशिवाय आत्मविश्वासही अशक्य आहे.
रत्नसुंदरवाणी... परिवर्तन घडविण्याची क्षमता पर्युषण पर्वात
औरंगाबाद : भुंगा किंवा भ्रमर हा फुलांमधील रस शोषून घेताना फुलाला हानी पोहोचवीत नाही. त्याला कचर्यावर जरी ठेवले तरी तो त्यातून फूल शोधून काढेल. प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये मधुकरवृत्ती आणली पाहिजे. जग आणि स्वत:कडे पाहताना मनामध्ये आदरभाव आणि आत्मसन्मान हवाच. आत्मसन्मानाशिवाय आत्मविश्वासही अशक्य आहे. या जगात परिपूर्ण कुणीही नाही. कितीही मोठा संत-महात्मा असला तरी त्याच्यात काही ना काही अवगुण असतातच आणि कितीही मोठा चोर असला तरी त्याच्यात एखादा तरी चांगला गुण असतोच. आम्ही कुणाला कसे पाहतो. यावर सारे अवलंबून आहे. आज माणसाला चांगल्या विचारांकडे वळविताना खूप कष्ट पडतात; परंतु वाईट विचारांकडे तो चटकन वळतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. पर्युषण पर्वात नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातून हद्दपार करा, कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका, निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल राखा तरच निसर्गाचे बिघडलेले चक्र सुधारू शकेल. आपल्या सभोवतालचे वातावरण, निसर्ग आपल्यावर प्रभाव टाकीत असते. इतरांप्रति नेहमी आदराचीच भावना ठेवा, बदल्याच्या भावनेला मनामध्ये मुळीसुद्धा थारा देऊ नका, कोणत्याही परिस्थितीत पराभव कधी स्वीकारू नका, संघर्ष करा आणि त्यातून यश मिळवा. क्षमापनेमध्ये त्यांनी चुकीच्या व्यक्तीकडून काही त्रास झाल्यास ते विसरून जा, त्याला क्षमा करा, नकारात्मक विचारांशीच सतत लढा द्या आणि सहनशक्ती वाढवा. सहन करायला शिका.