Join us  

श्रीगोंद्यात लिंबांचे दर ३० रुपयांवरून ८ रुपये किलो, थंडी सुरू होण्यापूर्वीच झाली दरात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 2:58 AM

लिंबाच्या व्यापारावर बाजार समितीचे लक्ष आहे.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : थंडी सुरू होण्यापूर्वीच लिंबाचे भाव ३० रुपये किलोवरुन थेट आठ रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. दररोज ३०० मेट्रिक टन लिंबाचे उत्पादन होत आहे. मात्र भाव घसरल्याने लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.सध्या उत्तर भारतातील बाजारपेठेत लिंबू २० रुपये किलो आहे. पण वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने व्यापाऱ्यांनी लोणचे बनविणाºया कंपन्यांना लिंबू देण्यास सुरुवात केली आहे.लिंबाच्या व्यापारावर बाजार समितीचे लक्ष आहे. पण बाजारपेठेत मंदी आहे. तरी शेतकऱ्यांच्या लिंबाला चांगला भाव देण्यासाठी व्यापाºयाची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिली.शेतकºयांनी टँकरने पाणी घालून दुष्काळात लिंबोणीच्या बागा जगविल्या आहेत. अनेक बागा दुष्काळाच्या वनव्यात गेल्या. त्यामुळे लिंबू शेतीला चांगले दिवस येतील अशी आशा होती. पण लिंबाचे भाव कोसळले आहेत.-किसन बोरुडे,शेतकरी, श्रीगोंदा.उत्तर भारतातील लिंबाचे भाव ४० रुपये किलोच्या वर गेले आहेत. वाहतूक खर्च जाऊन शेतकºयांना ३० रुपये किलोचा भाव देता येतो. पण सध्या लिंबाला बाजारपेठेत मागणी नसल्याने लोणचे कंपन्यांना लिंबू द्यावे लागते. लिंबू व्यापार ना नफा ना तोटा तत्त्वावर करावा लागत आहे.-आदिनाथ वांगणे,लिंबू व्यापारी, श्रीगोंदा

टॅग्स :व्यवसाय