Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून

By admin | Updated: August 25, 2014 23:48 IST

सोलापूर जिल्ह्यातील घटना : धारदार शस्त्राने वार करून मृतदेह विहिरीत टाकला

सोलापूर जिल्ह्यातील घटना : धारदार शस्त्राने वार करून मृतदेह विहिरीत टाकला
सांगोला : जुजारपूर-कड्याचा मळा (ता. सांगोला) येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केला आणि तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिला. रविवारी सायंकाळी पाच ते पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ७ वीत शिकणारी ही १२ वर्षीय मुलगी किराणा दुकानाचे सामान आणण्यासाठी गावात गेली होती. दरम्यान अज्ञात नराधमाने तिच्यावर पाळत ठेवून किराणा सामान घेऊन घराकडे परतत असताना वाटेत तिला अडवून बलात्कार केला. नंतर त्याने तिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला आणि एका शेतातील विहिरीत फेकून दिला. सायंकाळचे सात वाजले तरी मुलगी घरी का आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. या विहिरीच्या जवळ तिची चप्पल, ओढणी व किराणा सामान आणि विहिरीत ही मुलगी आढळली.