Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब पाटील

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

भोगावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे.

भोगावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे झालेल्या राज्यकामगार बैठकीत या निवडी झाल्या. अध्यक्षस्थानी अविनाश आपटे होते. राज्याध्यक्ष बी. आर. पाटील आणि किशोर पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर या निवडी केल्या आहेत. रावसाहेब पाटील याचे मूळ गाव आवळी बु।। (ता. राधानगरी) आहे.