Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर कपूर झाला ‘रेनॉ’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By admin | Updated: August 5, 2015 22:57 IST

वाहननिर्मितीत अग्रेसर असलेल्या रेनॉ कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूर याची नेमणूक केली आहे. कंपनीची विविध वाहने आणि रणवीरची इमेज

मुंबई : वाहननिर्मितीत अग्रेसर असलेल्या रेनॉ कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूर याची नेमणूक केली आहे. कंपनीची विविध वाहने आणि रणवीरची इमेज हे एकमेकांना पूरक वाटत असल्यानेच ही नेमणूक करण्यात आली, असे विश्लेषण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत शॉनय यांनी केले आहे.सुमीत शॉनय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे हे भारतातील चौथे वर्ष आहे. कंपनीच्या वाहनांची मालिका जर विचारात घेतली, तर प्रत्येक वाहनाचे आकर्षक अभिनव डिझाईन आहे. क्षमता आणि परफॉर्मन्सदेखील उत्तम आहे. हे वाहन आकर्षक आहे. नेमके हेच साधर्म्य आम्हाला चित्रपटसृष्टीत भरीव योगदान देणाऱ्या कपूर कुटुंबाच्या चौथ्या पिढीत अर्थात रणवीरच्या रूपाने दिसले आहे. त्यामुळेच त्याची आम्ही निवड केल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात रणवीर कपूरने प्रतिक्रिया देताना सांगितले की, या कंपनीची मला उत्तम माहिती आहे. कंपनीने भारतातही आता चांगला जम बसविला आहे. या कंपनीने मला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केल्याचा मला आनंद वाटतो, असे रणवीर म्हणाला.