चित्रपट कलाकारांना केवळ स्टार्सचा दर्जाच मिळत नाही तर त्यांच्याकडे लाखो कोटींची कमाईसोबत लक्झरी वस्तूही असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरआरआर (Movie RRR) फेम अभिनेता राम चरणच्या (Ram Charan) सासू शोभना कामिनेनी श्रीमंतीमध्ये अभिनेत्यापेक्षा चार पावलं पुढे आहेत. त्यांची नेटवर्थ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
राम चरण यांच्या सासू आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट शोभना कामिनेनी या केवळ एक नाव नाही, तर भारताच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीतील एक शक्तिशाली बिझनेसवुमन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अपोलो समूहानं डिजिटल हेल्थकेअर, फार्मसी आणि इन्शुरन्स सारख्या क्षेत्रात पाय रोवले आहेत. रामचरण यांची सासू काव्या मारन यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रीमंत आहे.
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
अपोलो हॉस्पिटलच्या मालक
शोभना कामिनेनी या अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रताप सी. रेड्डी यांच्या तिसऱ्या कन्या आहेत. डॉ. प्रीता रेड्डी, डॉ. सुनीता रेड्डी आणि डॉ. संगीता रेड्डी या त्यांच्या तीन बहिणीही या आरोग्यसेवेचं साम्राज्य चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अपोलो रुग्णालयाचं बाजार भांडवल सुमारे ७७,००० कोटी रुपये आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा कंपन्यांपैकी एक आहे.
काय काम करतात?
शोभना कामिनेनी या अपोलो हेल्थको आणि अपोलो फार्मसीजच्या कार्यकारी अध्यक्षा आहेत. त्यांनी अपोलो २४/७ सारख्या डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मचे नेतृत्व केलंय, टेलिमेडिसिन आणि ऑनलाइन सल्लामसलतीला प्रोत्साहन दिलं. याशिवाय त्यांनी भारतातील पहिली बायोबँक स्थापन केली, ज्याचा टाइम मॅगझिननं दशकातील टॉप १० लाइफ सायन्स आयडियामध्ये समावेशही केलाय.
शोभना यांनी 'बिलियन हार्ट्स बीटिंग' नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली, जी भारतातील हृदयरोगाच्या प्रतिबंधासाठी काम करते. त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) सदस्या आहेत आणि भारतात डिजिटल हेल्थकेअर आणि मनुष्यबळ विकासावर सक्रियपणे काम करत आहेत.
शोभना कामिनेनी यांनी चेन्नईच्या स्टेला मेरिस कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. रामचरण याची पत्नी उपासना कामिनेनी ही अपोलो फाऊंडेशनची उपाध्यक्ष असून कौटुंबिक व्यवसायात सक्रिय भूमिका बजावत आहे.