Join us

राजेश जोशी ....१ ....

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST


ठगबाज राजेश जोशीला २० पर्यंत पीसीआर
- रविराज फायनान्स घोटाळा : ५७ जणांकडून ३.१९ कोटी लुबाडले

नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एम. लालवानी यांनी २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला. याआधी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांनी त्याला १० दिवसांचा पीसीआर दिला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी जोशीकडून विविध आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली. शिवाय त्याने कंपनीच्या खात्यातून अंजनगाव येथील रविराज कृषी प्रा.लि. या कंपनीकडे ३४ लाख रुपये वळते केले आहे. तसेच त्याने सप्टेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यातून ५० लाख रुपये रोख विड्रॉल केले. त्याच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांची विचारपूस आणि वाहने जप्त करायची असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी न्यायालयात केला. जोशी याच्याकडे रामदासपेठ येथील रचना सोसायटीमध्ये फ्लॅट, सोनेगाव येथे भूखंड, कामठी आणि मेट हिरडी (कारंजा तहसील) येथे जमीन आणि देवनगर येथे कार्यालय व निवासाची जागा आहे. सर्व जागेची कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात आहेत. उपरोक्त सर्व आर्थिक व्यवहारांचा पोलीस तपास करीत आहेत.

५७ गुंतवणूकदारांची ३.१६ कोटींची फसवणूक
आतापर्यंत राजेश जोशीच्या विरोधात ५७ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून त्यांना जोशीने ३ कोटी १६ लाख ९० हजार रुपयांनी फसविले आहे. तक्रारकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजेशने विवेकानंदनगर येथील आपल्य कौस्तुभ बंगल्यात जानेवारी २०१० मध्ये रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनी या नावाने आपला गोरखधंदा सुरू केला होता. या अंतर्गत त्याने रविराज मायनिंग, रविराज ॲग्रो, रविराज वेल्थ मॅनेजमेंट, रविराज इन्फ्राकॉन आणि रविराज सेंटर फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन या नावाने वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या होत्या.