राज्यात पावसाची विर्शांती
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
पुणे : बंगालच्या उपसागराचा निर्माण झालेला कमी दाबाचा प?ा विरून गेल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाने दडी मारली आहे. केवळ काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली.
राज्यात पावसाची विर्शांती
पुणे : बंगालच्या उपसागराचा निर्माण झालेला कमी दाबाचा प?ा विरून गेल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाने दडी मारली आहे. केवळ काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली. मागील आठवड्यात पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली होती. विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने राज्यात काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झाल्याने राज्यातील पाऊस कमी झाला. शुक्रवारी नागपूर व महाबळेश्वर ही प्रमुख शहरे वगळता कुठेही जोरदार पाऊस झाला नाही. पुण्यासह बहुतेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मुंबई, कोल्हापूर व रत्नागिरी येथे अनुक्रमे 0.2, 0.1 व 0.5 मिमी पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बहुतेक ठिकाणी पावासने दडी मारली. येत्या 48 तासांतही राज्यात तुरळक पावसाचीच शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)--------------