Join us

रेल्वेच्या उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ

By admin | Updated: April 20, 2015 23:36 IST

भारतीय रेल्वेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १,५७,८८०.५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गेल्यावर्षी १,४०,७६१.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १,५७,८८०.५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गेल्यावर्षी १,४०,७६१.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. यंदा त्यात १२.१९ टक्के एवढी वाढ झाली.यावर्षी मालवाहतुकीतून १,०७,०७४.७९ कोटी रु. मिळाले. गेल्या वर्षी याच काळात मालवाहतुकीतून ९४,५५५.८९ कोटी रु.चे उत्पन्न मिळाले होते. यंदा मालवाहतुकीच्या उत्पन्नात १२.७६ टक्क्यांची वाढ झाली.प्रवाशांकडून यावर्षी ४२,८६६.३३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा महसूल १४.३८ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी प्रवाशांकडून ३७.४७८.३४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा इतर स्रोतांमार्फत मिळालेले उत्पन्न ४०३५.३४ कोटी असून गेल्या वर्षी हे उत्पन्न ३,८१८.०३ कोटी रुपये होते. या उत्पन्नातही ५.७० टक्के एवढी वाढ नोंदली गेली.