Join us

रेल्वे तिकीट दुस-याच्या नावे करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:54 IST

तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल, तर ते तुम्ही दुसºयाच्या नावे करू शकाल वा कुटुंबातील अन्य व्यक्ती या तिकिटावर प्रवास करू शकेल.. रेल्वेने ही सुविधा दिली आहे.

नवी दिल्ली : तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल, तर ते तुम्ही दुसºयाच्या नावे करू शकाल वा कुटुंबातील अन्य व्यक्ती या तिकिटावर प्रवास करू शकेल.. रेल्वेने ही सुविधा दिली आहे.रेल्वेने म्हटले आहे की, काही महत्त्वाच्या स्थानकांवर मुख्य आरक्षण पर्यवेक्षकास तिकिटावरील नाव बदलण्याचे अधिकार आहेत. तिकीटधारक सरकारी नोकर असल्यास प्रवासाच्या २४ तास आधी लेखी अर्ज केल्यास त्याचे तिकीट दुसºयाच्या नावे केले जाईल.तिकीट कुटुंबातील पिता, माता, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावेही करता येईल. मात्र तसा लेखी अर्जही २४ तास आधी द्यावा लागेल. लग्नाच्या वºहाडातील सदस्यांनाही अन्य वºहाडींच्या नावे तिकीट करतायेईल.

टॅग्स :भारतीय रेल्वेतिकिटबातम्या