नवी दिल्ली : मालवाहतुकीतून अतिरिक्त चार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वेच्या वेगवेगळ्या मालाच्या वाहतूक दरांत १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यात वाढ जरी केलेली नसली, तरी माल वाहतुकीच्या भाड्यात सरासरी ३.२ टक्के वाढ केली आहे. या भाडेवाढीचा थेट परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंसह पोलाद आणि अॅल्युमिनियम उद्योगावर होईल. देशात रेल्वे स्टेशन्सवर एक एप्रिलपासून प्लॅटफॉर्म तिकीट पाचऐवजी १० रुपये होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
उद्यापासून रेल्वेची मालवाहतूक, प्लॅटफॉर्म तिकीट महागणार
By admin | Updated: March 31, 2015 01:18 IST