Join us

रडार खराब, इंटरसेप्टर गायब

By admin | Updated: September 20, 2014 23:30 IST

रडार खराब, इंटरसेप्टर गायब

रडार खराब, इंटरसेप्टर गायब
पणजी: महामार्गावरून धावणार्‍या वाहनांची गती तपासण्यासाठी अनेक ठिकाणी इंटरसेप्टर (गतिरोधक पोलीस) दिसत होते. काही महिन्यांपासून ते एकाएकी नाहीसे झाले ते अजून दिसले नाहीत. याचे कारण आता उघड झाले असून त्यांच्याकडील गतीचा वेध घेणारी रडार यंत्रे मोडली आहेत.
वाहने कितीही वेगाने आली तरी रडारच्या टापूत ते अवघे काही सेकंद जरी आले तरी त्या वाहनाच्या वेगाचा वेध अचूक घेतला जातो. या यंत्रावरील विशेष फॉम्युलाद्वारे डिजिटल पद्धतीने वेग नोंदविला जातो. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्याशिवाय वाहन चालकापुढे दुसरा पर्याय नसतो. अशा प्रकारची रडार यंत्रे घेऊन महामार्गावर खास वाहन घेऊन मोक्याच्या ठिकाणी इंटरसेप्टर उभे असतात. विशेष करून दुरून येणारी वाहनेही दिसतील अशा ठिकाणी ते असतात. जेणेकरून ती त्यांच्या रडारमध्ये टीपण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो. वाहतूक पोलिसांकडे असलेली दोन्हीही रडारे खराब झाल्याची माहिती वाहतूक खात्याच्या एका अधिकार्‍याकडून देण्यात आली.
ँरडार यंत्रेच नसल्यामुळे रस्त्यावर राहून काय करणार म्हणून इंटरसेप्टिंग पद्धतच बंद करण्यात आली आहे. कारण चालकाला ठोठावण्यात येणार्‍या प्रत्येक दंडाचे चालक कारण विचारतात, कारण सांगितल्यास पुरावे मागतात. आता सर्वच लोकांच्या वरिष्ठांपर्यंत ओळखी असल्यामुळे अशावेळी नियमभंगाचे पुरावे नसल्यामुळे कारवाई करणार्‍यावरच प्रकरण बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरसेप्टिंग प्रकारच बंद केल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.