नवी दिल्ली : उद्योग व्यवसायासाठी वातावरण अधिक चांगले करण्याच्या भारत सरकारच्या धोरणानंतर आॅक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्याची योजना नियोक्त्यांनी आखली आहे. ‘मॅन पॉवर’च्या एका सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे.आगामी काळात रोजगारविषयक दृश्य कसे असेल याबाबत ‘मॅन पॉवर’ने सर्वेक्षण केले होते. त्यात आॅक्टोबर- डिसेंबरदरम्यान नियुक्त्यांचा वेग वाढेल, असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात भारताच्या ५,०४७ नियोक्त्यांना सामील करून घेण्यात आले होते. ४१ टक्के नियोक्त्यांनी नियुक्त्या करणार असल्याचे सांगितले. त्याचा फायदा नोकरी करू इच्छिणाऱ्यांना आणि उद्योगांनाही होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘मॅन पॉवर’ ग्रुपचे प्रबंध संचालक ए. जी. राव म्हणाले की, व्यवसायासाठी नियम शिथिल करण्याचे धोरण सरकार स्वीकारणार आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांची देशात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
तिमाहीत नियुक्त्या वाढणार
By admin | Updated: September 9, 2015 03:24 IST