Join us

कतार एअरवेजची सेवा १ डिसेंबरपासून

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

नागपूर-दोहा-नागपूर : पुरेसे प्रवासी मिळण्याचा कंपनीला विश्वास

नागपूर-दोहा-नागपूर : पुरेसे प्रवासी मिळण्याचा कंपनीला विश्वास
नागपूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ डिसेंबरपासून कतार एअरवेजच्या सेवेला प्रारंभ होणार आहे. कंपनी नागपूर-दोहा-नागपूर असे विमान सुरू करणार आहे. नागपुरात पुरेसे प्रवासी व कार्गो मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. २००८ ते २००९ या काळातही कंपनी नागपुरात कार्यरत होती.
कंपनीने प्रवाशांना विशेष महत्त्व दिले आहे. विमानात १३२ इकॉनॉमिक क्लास तर १२ बिझनेस क्लास सीटस् आहेत. या मार्गावर एअरबस-३२० उड्डाण भरणार आहे. नागपूर-दोहा विमानसेवा बंद झाल्यानंतर मुंबई व दिल्ली येथून विमान पकडावे लागत होते. यात खर्च अधिक होत होता. कतार एअरवेजच्या सेवेमुळे विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व अन्य सीमालगत शहरांतील प्रवाशांना दोहा किंवा दुबईला जाणे सोयीचे होणार आहे. असंख्य भारतीय खाडी देशात नोकरी करतात. याशिवाय पर्यटनासाठी खाडी देशांत जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कंपनीने विदेशात नोकरी करणाऱ्यांचा विचार करून भाडे निश्चित केले आहे. सध्या कंपनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोच्ची, तिरुअनंतपुरम, कोझीकोड व गोवा येथे सेवा देत आहे. दोहा हबच्या माध्यमातून ही कंपनी बार्सिलोना, शिकागो, डलास, ह्युस्टन, लंडन, मियामी, न्यूयॉर्क, पॅरिस, फिलाडेल्फिया, रोम व वॉशिंग्टन डीसी यासह अन्य शहरांशी जुळलेली आहे. मिहानमध्ये बोईंगचा एमआरओ प्रकल्प सुरू झाला आहे. रिलायन्स कंपनीने अलीकडेच मिहानमध्ये हेलिकॉप्टर तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे येथे उल्लेखनीय.
-----------
चौकट.....
उड्डाणाची वेळ
विमानक्रमांकप्रस्थानआगमन
दोहा-नागपूरक्यूआर ५८८१९.५५०२.१५
नागपूर-दोहाक्यूआर ५८९०३.४५०५.५५