Join us

पंप चालकांचा १२ रोजी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 00:29 IST

पेट्रोलपंपांचे १०० टक्के आॅटोमेशन (स्वयंचलित) करावे व दररोज किंमत बदलण्याची पद्धत अधिक पारदर्शी करावी या मागणीसाठी देशभरातील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पेट्रोलपंपांचे १०० टक्के आॅटोमेशन (स्वयंचलित) करावे व दररोज किंमत बदलण्याची पद्धत अधिक पारदर्शी करावी या मागणीसाठी देशभरातील पेट्रोल पंपचालकांनी १२ जुलै रोजी बंद पुकारला आहे. आॅल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे (एआयपीडीए) पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष तुषार सेन यांनी सांगितले की, विरोध म्हणून आम्ही ५ जुलै रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या नव्या दर पद्धतीमुळे लहान डिलर्सना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.