Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या बफर स्टॉकसाठी टिपणे मागविली

By admin | Updated: November 2, 2015 00:06 IST

डाळींचे वाढते भाव लक्षात घेऊन ३.५ लाख टन डाळींचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. २0१५-१६ या वर्षात हा साठा केला जाईल

नवी दिल्ली : डाळींचे वाढते भाव लक्षात घेऊन ३.५ लाख टन डाळींचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. २0१५-१६ या वर्षात हा साठा केला जाईल. या मुद्यावर विविध मंत्रालयांकडून टिपणे मागविण्यात आलीआहेत. बफर स्टॉकमधील १.५ लाख टन डाळ चालू खरीप हंगामात खरेदी केली जाईल. त्यात तूर आणि उडदाच्या डाळीचा समावेश असेल. उरलेली २ लाख टन डाळ रबी हंगामात खरेदी केली जाईल. त्यात चणा डाळ आणि मसूर डाळीचा समावेश असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)