Join us

लोकोपयोगी कार्य लोक सहभागानेच शक्य - संतोष कोरपे जिल्हा बँकेचे रुपे एटीएम कार्ड लोकार्पण मार्च १५ पर्यंत १ लाख कार्ड वितरित करणार २०१५ मध्ये

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

अकोला - समाजाकरिता करावयाचे कोणतेही कार्य लोक सहभागाशिवाय शक्य नाही. लोकोपयोगी कार्यात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असेल तरच या कार्यात यश मिळते. म्हणून लोकोपयोगी कार्याकरिता समाजातील लोकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी केले. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मार्च २०१५ पर्यंत अकोला-वाशिम जिल्‘ातील १ लाख बँक खातेदराांना एटीएम कार्ड सुविधा पुरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शा.द. वानखडे (आय.ए.एस.) उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. वानखडे म्हणाले, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरारी कौतुकास्पद आहे. जिल्हा सहकारी बँकेमार्फत इतर बँकाप्रमाणे अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. यावर विश्वासच बसत नव्हता. मात्र या बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अकोला-वाशिम जिल्‘ातील शेतकर्‍यांना के.सी.सी. कार्ड सोबतच आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा शेतकर्‍यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. तद्वतच पीककर्जाशिवाय शेती विकासाची मध्यम मुदती कर्जे घेऊन शेतकर्‍यांनी आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवावे.
एटीएम लोकार्पण समारंभात डॉ. अभिजित वैद्य, संतोष देसले (पाटील), श्रीकांत चाळीसगावकर, स्मिता धामणे, जयश्री देशपांडे, सुनील जानोकार, रवींद्र मानकर, अनिल अंभोरे, अंकुश पटेल, प्रदीप खाडे, अमीत महल्ले, अनंत गद्रे, सुरेशचंद्र जगताप, राजेश आमले, अनिल राऊत, सुधीर देशमुख, विनायक भोपाळे, अनंत वैष्णव यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते एटीएम कार्ड प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित वैद्य, प्रदीप खाडे, सावरकर यांनी आपल्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र भालेराव यांनी केले.
कार्यक्रमास बँकेचे संचालक डॉ. सुभाषचंद्र कोरपे, रामसिंग जाधव, प्रकाशराव लहाने, प्रा. हरिभाऊ हिवरे, प्रकाश कुटे, राजूभाऊ राऊत, राजाभाऊ बोर्डे, बी.जे. काळे विशेष कार्यकारी अधिकार, जे.बी. म्हैसने संसाधान प्रमुख, पी.पी. शेंडे सहा. व्यवस्थापक, एस.के. मोहोड सहा. व्यवस्थापक, ए.एन. पवार मुख्याधिकारी, एम.वाय. अगमे मुख्याधिकारी व कर्मचारी ,नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. समारोप डॉ. सुभाषचंद्र कोरपे यांनी तर आभार प्रदर्शन बँकेचे व्यवस्थापक अनंत वैद्य यांनी केले.
फोटो - १७ सीटीसीएल ४१
रुपे एटीएम कार्डाचे उद्घाटन करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, डॉ. शा.द. वानखडे, नरेंद्र भालेराव.
(८ बायमध्येघेणे)
----------------------