Join us

सवलतीत शेतकऱ्यांना धान्याचा पुरवठा

By admin | Updated: August 9, 2015 22:07 IST

राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्या पृष्ठभूमीवर मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यांतील गोरगरीब शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने

साहेबराव राठोड , मंगरूळपीर (वाशिम)राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्या पृष्ठभूमीवर मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यांतील गोरगरीब शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले होते. या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू झाली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थींचा शोध घेत आहेत.राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी कुटुंबाला सार्वजनिक वितरणप्रणालीतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर स्वस्तातील अन्नधान्य देता येईल का, यावर शासन स्तरावर मंथन होऊन, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गोरगरीब शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर अन्नधान्य पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जारी केले.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गावपातळीवर तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार यांना जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठक घेतली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. एपीएल (केशरी)मधील लाभार्थींच्या यादीतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो, त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.