Join us

प्रॉव्हिडंट फंड खात्याची बँकेशी सांगड सक्तीची

By admin | Updated: August 14, 2014 03:55 IST

भविष्य निर्वाह निधी खात्याचा क्रमांक कायम ठेवण्याच्या (नंबर पोर्टेबिलिटी) योजनेची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक प्रॉव्हिडंट फंड खात्याची त्या खातेदाराच्या बँक खात्याशी सांगड घालण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : प्रत्येक सदस्यास एक खास खातेक्रमांक (युनिक अकाऊंट नंबर) देऊन हा सदस्य कर्मचारी नोकरीनिमित्त देशाच्या कोणत्याही भागात गेला तरी त्याचा भविष्य निर्वाह निधी खात्याचा क्रमांक कायम ठेवण्याच्या (नंबर पोर्टेबिलिटी) योजनेची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक प्रॉव्हिडंट फंड खात्याची त्या खातेदाराच्या बँक खात्याशी सांगड घालण्यात येणार आहे.भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सूत्रांनी सांगितले की, प्रॉ. फंडाच्या विद्यमान पाच कोटी खातेदारांच्या खात्यांची बँक खात्यांशी घालण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असले तरी यापुढे उघडले जाणारे प्रॉ. फंडाचे प्रत्येक खाते सदस्याच्या बँक खात्याशी निगडित तकून मगच उघडले जाईल. ‘ईपीएफओ’च्या मुख्यालयाने त्यांच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना ही पद्धत सूचित केली असून जिल्हा आणि तालुका पातळीवर बँकांशी संपर्क साधून याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.भविष्य निर्वाह निधीचे खाते बँक खात्याशी निगडित केल्याशिवाय ‘युनिक अकाऊंट नंबर’ची संकल्पना राबविणे शक्य होणार नाही. शिवाय सदस्याचे बँक खाते हा ‘ईपीएफओ’च्या दृष्टीने एक महत्वाचा ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) दस्तावेजही ठरेल,असेही या सूत्रांनी सांगितले.एका अधिकाऱ्याने सांगितले की, सदस्याचे भविष्य निर्वाह निधीचे खाते त्याच्या बँक खात्याशी निगडित केले की मालकाकडून त्याच्या खात्यात गडबड केली जाण्याची शक्यता कमी होईल. शिवाय पी.एफ.टा कोणताही व्यवहार रोखीने करणे आता बंद करण्यात असल्याने या खात्यांमध्ये दरमहा होणारा भरमा व निवृत्तीनंतर खात्याचा अंतिम हिशेब करण्याची कामे निर्वेधपणे पार पडू शकतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)