Join us

काठीपाडाला वसतिगृहाची सोय करा

By admin | Updated: June 23, 2014 22:51 IST

आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडे

आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडेनाशिक : सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठीपाडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह नसून, येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होेत आहे. वसतिगृह सुरू न केल्यास २९ जूनपासून आदिवासी विद्यार्थी व पालक आदिवासी विकास आयुक्तालयासमोर उपोषण करतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य चिंतामण गावित यांनी आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिला आहे.सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर चिंतामण गावित यांच्यासह आदिवासी विद्यार्थी व पालकांनी निदर्शने करून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरगाणा तालुका अतिदुर्गम असून, आदिवासी मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनंत अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काठीपाडा येथील वसतिगृहाचा प्रस्ताव पाठवूनही वसतिगृह मंजूर होत नाही. विशेष म्हणजे काठीपाडा येथे चार कनिष्ठ महाविद्यालये आहेत. मात्र वसतिगृहाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. आदिवासी विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडतात. तरी काठीपाडा येथे तत्काळ वसतिगृह सुरू करावे, अन्यथा २९ जूनला आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आदिवासी पालक व विद्यार्थी धरणे आंदोलन व उपोषण करतील, असा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)