Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांसमोर राज्यकर्त्यांनी खेळली होळी

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST


(हॅलोसाठी लीड)

आंदोलकांसमोर राज्यकर्त्यांनी खेळली होळी

साधी विचारपूसही नाही : कामगार, सुरक्षा रक्षकांमध्ये संताप

पणजी : नोकरी वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने महिनाभर आझाद मैदानावर कधी उपाशी तर कधी अर्धपोटी बसून आंदोलन करणार्‍या सुरक्षा रक्षक आणि १0८ रुग्णवाहिकांच्या कर्मचार्‍यांसमोर सत्ताधार्‍यांमधील राजकारण्यांनी होळी खेळली. मासिक वेतन देखील न मिळालेल्या आंदोलकांची होळी खेळणार्‍या राजकारण्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही, अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली.
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आझाद मैदानावर धुलिवंदन आयोजिले होते. त्यात राजधानीतील नागरिक व सत्ताधारी राजकारण्यांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर व इतर सत्ताधारी पक्षांतील राजकारणी येथे उपस्थित होते. मैदानावर साधारण पाचशेहून अधिक आंदोलनकर्ते मागण्यांसाठी निदर्शने करत होते. पर्रीकर आपल्याकडे येऊन विचारपूस तरी करतील, अशी भाबडी आशा त्यांच्या मनात होती. मात्र, पर्रीकर आझाद मैदानावर येऊन थेट होळी खेळण्यास गेले. येता-जाता त्यांनी दुर्लक्ष करणेच पसंत केल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
देशाचे संरक्षणमंत्री म्हणून ज्या राजकारण्याची नियुक्ती झाली ते गोव्यात होळी खेळण्यासाठी येतात. सत्ताधारी पक्षाचे नेते असल्याने पर्रीकर तरी आमची विचारपूस करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संवेदना हरवलेल्या या नेत्यांनी निदर्शनाकडे आणि आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. एकेकाळी आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी पर्रीकर शक्ती वापरत होते. आता सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला. होळी ही प्रेमाची, आपुलकीचे प्रतीक असते. नोकरी वाचविण्यासाठी धडपड करणार्‍या आंदोलनकर्त्यांना सहानुभूती, आपुलकी दाखवता येत नसणार्‍या नेत्यांकडून कसली अपेक्षा करावी, असा प्रश्न अंदोलकांच्या नेत्या स्वाती केरकर यांनी केला. (जोड बातमी आहे..