Join us

मनपा प्रशासनाविरोधात भाजपचे धरणे आंदोलन मनमानी कारभाराचा केला निषेध

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST

अकोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्‍या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती, रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने निषेध व्यक्त करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले. धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

रामदेव बाबा यांची दिव्य ज्योत अकोल्यात दाखल झाल्याच्या निमित्ताने जम्मा जागरण, रामदेव बाबा सेवा समिती व टेकडीवाल परिवाराच्यावतीने २८ ऑगस्ट रोजी कीर्तीनगरमधील एका खासगी भूखंडावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भूखंडावर उभारण्यात आलेल्या मंडपासाठी मनपाची परवानगी नसल्याच्या मुद्यावरून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे व इतर कर्मचार्‍यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी शाम बाबा सेवा समिती, रामदेव बाबा सेवा समिती, श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व भाजपच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामध्ये खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, डॉ. अशोक ओळंबे, हरीष आलीमचंदानी, सुमनताई गावंडे, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, रणधीर सावरकर, गिरीश जोशी, राजेश मिश्रा, नगरसेविका वैशाली शेळके, नगरसेवक अजय शर्मा, अशोक डालमिया,अशोक गुप्ता, हरिभाऊ काळे, विजय इंगळे, भाजयुमोचे छोटू गावंडे, योगेश धुमाळे उपस्थित होते.

-फोटो-०१सीटीसीएल-६३-