Join us  

भारतीय कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात, विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 8:19 AM

हे विधेयक मंजूर झाल्यास भारतातील कॉल सेंटरमधील नोक-या धोक्यात येणार आहेत.

वॉशिंगटन : अमेरिकेबाहेरील कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांना ते कोठून बोलत आहेत, हे उघड करणे बंधनकारक करणारे तसेच आपला कॉल अमेरिकेतील सर्व्हिस एजंटला जोडून घेण्याचा हक्क कॉल करणा-या ग्राहकास देणारे एक विधेयक अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहात सादर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारतातील कॉल सेंटरमधील नोक-या धोक्यात येणार आहेत.

ओहिओचे सिनेटर शेरॉड ब्राऊन यांनी हे विधेयक मांडले आहे. त्यांनी सभागृहात सांगितले की, ओहिओमधील कॉल सेंटर मोठ्या प्रमाणात भारत किंवा मेक्सिकोला स्थलांतरित केले जात आहेत. अमेरिकेच्या अन्य प्रांतांतही हीच अवस्था आहे. या कॉल सेंटरमधील नोक-यांची हमीच राहिलेली नाही.

अमेरिकेतील भारतीय रस्त्यावर ग्रीन कार्डचा अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी अनेक शहरांत शांततापूर्ण रॅली काढली. ग्रीन कार्ड हा अमेरिकी नागरिकत्वाचा दस्त असून त्यासाठी अमेरिकी सरकारने प्रत्येक देशासाठी ठरावीक सात टक्के कोटा ठरवून दिलेला आहे.