पुणे : दीर्घ काळापासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कामगारांना कायम करण्यात यावे, यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे कामगार आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी रविवारी पुण्यात दिली. रमणबाग प्रशालेत भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या २१व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मेहता यांच्या हस्ते झाले. यानंतर कामगारांशी संवाद साधताना नवा कामगार कायदा जाचक असल्याची चर्चा होत असल्याचा धागा पकडून ते म्हणाले, ‘‘नव्या कामगार कायद्यात अशा कोणत्याही तरतुदी नसतील. उलट कामगारांसाठी कल्याणकारक धोरण आखण्यावर भर असेल. गेल्या ६० वर्षात कामगार कायद्यात कोणतेही बदल झालेले नाहीत़ काही राज्यांमध्ये असे बदल झालेले आहेत़ त्यावर अभ्यास करण्यासाठी राज्याने समिती स्थापन केली आहे़’’नवीन कामगार कायद्यातील तरतुदी ठरवण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापणार येणार आहे. यात कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश असेल. राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका जनतेला पार पाडायची आहे, असेही ते म्हणाले.
‘त्या’ कंत्राटींना कायम करण्याचा प्रस्ताव -मेहता
By admin | Updated: April 13, 2015 11:37 IST