Join us  

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण; बुधवारी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:00 AM

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये होणार असून, अन्य दोन बँकांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागेल.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांचे खासगीकरण करताना ते टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. याबाबत एक बैठक बुधवार, दि.१४ रोजी बोलाविण्यात आली असून, त्यामध्ये याबाबतच्या निर्णयाची शक्यता आहे. चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये होणार असून, अन्य दोन बँकांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागेल. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग आणि अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक येत्या बुधवारी बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या दोन बँका कोणत्या ते ठरण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे.

टॅग्स :बँक