Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगफिशर’च्या अधिकाऱ्यास तुरुंगवास

By admin | Updated: September 23, 2016 01:47 IST

किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी मुख्य वित्त अधिकाऱ्यास येथील स्थानिक न्यायालयाने दोन धनादेशांच्या अनादर (बाउन्स झाल्याच्या) प्रकरणात १८ महिन्यांचा तुरुंगवासाची

हैदराबाद : विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी मुख्य वित्त अधिकाऱ्यास येथील स्थानिक न्यायालयाने दोन धनादेशांच्या अनादर (बाउन्स झाल्याच्या) प्रकरणात १८ महिन्यांचा तुरुंगवासाची तथा दंडाची शिक्षा सुनावली आहे. हैदराबादेतील तिसरे विशेष दंडाधिकारी एम. कृष्णा राव यांनीहा निकाल दिला. ए. रघुरानाथन असे शिक्षा झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने रघुनाथन आणि विजय मल्ल्या यांच्यावर हा खटला भरला होता. रघुनाथन हे न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना वरील शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २0 हजारांचा दंड ठोठावला. २0 एप्रिल रोजी न्यायालयाने किंगफिशर एअरलाइन्स, विजय मल्ल्या आणि रघुनाथन यांना दोषी ठरविले होते. त्यांच्या वतीने देण्यात आलेले प्रत्येकी ५0 लाखांचे दोन धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे फेटाळले (बाउन्स) गेले होते. विमानतळावरील सुविधा वापरल्याच्या बदल्यात हे धनादेश किंगफिशरच्या वतीने देण्यात आले होते. दोषी ठरविल्यानंतर रघुनाथन यांच्या विरोधातील समन्स बजावले गेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षा देण्याचा निर्णय अनेक वेळा पुढे ढकलावा लागला होता. ते आज न्यायालयात हजर झाले.दुसरे आरोपी विजय मल्ल्या फरार असल्यामुळे रघुनाथन यांच्याविरोधातील प्रकरणात शिक्षा सुनावण्यात यावी, असे विमानतळ व्यवस्थापनाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. आपल्यावर अनेक खटले असल्यामुळे या प्रकरणी हजर राहता आले नाही. तसेच या प्रकरणातील वॉरंटला आपण वरच्या न्यायालयातून स्थगितीही मिळविली आहे, असे रघुनाथन यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. तथापि, त्यांचे दावे न्यायालयात टिकले नाहीत. न्यायालयाने त्यांना १८ महिन्यांची शिक्षा तसेच दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २0 हजारांचा दंड ठोठावला.