Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमारीच्या जन्माने ब्रिटनमध्ये उमटली लक्ष्मीची पावले!

By admin | Updated: May 4, 2015 23:40 IST

ब्रिटिश राजकुमारी प्रिन्सेस आॅफ केंब्रिजच्या जन्मामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. राजकुमारीचा जन्म होऊन अवघे दोन दिवसच झाले असताना

लंडन : ब्रिटिश राजकुमारी प्रिन्सेस आॅफ केंब्रिजच्या जन्मामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. राजकुमारीचा जन्म होऊन अवघे दोन दिवसच झाले असताना अर्थव्यवस्थेत सुमारे आठ कोटी पौंडांची वाढ नोंदली गेली आहे. कारण राजघराण्याच्या चाहत्यांनी विविध संस्मरणीय वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली आहे. युवराज विल्यिअम आणि युवराज्ञी केट यांच्या या मुलीचा जन्म दोन मे रोजी झाला होता. स्थानिक माध्यमांतही राजकुमारीच्या जन्माने अर्थव्यवस्थेला मिळालेल्या चालनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजकुमारी कशा पद्धतीच्या वस्तू, पोशाख, फॅशन करील त्याचेच लोकांकडून मोठ्या प्रमाणात अनुकरण केले जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अर्थव्यवस्थेसोबत ब्रिटिश पर्यटन व्यवसायही भरभराटीस येईल. चाहत्यांच्या जोरदार खरेदीमुळे संस्मरणीय मग, प्लेट आणि टी-शर्ट विक्री करणाऱ्या दुकानांत यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. राजकुमारी दहा वर्षांची होण्यापूर्वी राजकोषात एक अब्ज पौंडापर्यंत वाढ होईल, असा दावा जाणकारांकडून केला जात आहे. ड्यूक आॅफ केंब्रिज अर्थात युवराज विल्यम यांचा पहिला मुलगा राजकुमार जॉर्ज याच्या जन्मामुळे २०१३ मध्ये ब्रिटिश अर्थव्यवस्थेत २४.७ कोटी पौंड एवढी उलाढाल झाली होती.काही जाणकारांच्या मते, राजकुमाराच्या छोट्या बहिणीचा जन्म लोकांच्या खरेदी प्रवृतीवर जॉर्जहून अधिक प्रभाव टाकणारा ठरेल. अशा काळात चाहते वेगळ्या फॅशनची खरेदी करण्यास प्राधान्य देतात.फॅशन सल्लागार पेट्रिशिया डेव्हिडसन यांच्या मते, ‘प्रत्येकाचे दुसऱ्याने काय परिधान केले आहे, याकडे लक्ष असेल. युवराज्ञी केटने आपल्या मुलीसाठी कपड्यांची खरेदी केली, तर लोक त्याचे अनुकरण करतील. (वृत्तसंस्था)