Join us

मोबाईल इंटरनेट क्षेत्रात किंमत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता

By admin | Updated: October 7, 2014 02:42 IST

नवीन दूरसंचार सेवा कंपनी एमटीएस इंडियाने मोबाईल इंटरनेटच्या दरांत जवळपास ३३ टक्क्यांनी घट केल्याची घोषणा सोमवारी केली

नवी दिल्ली : नवीन दूरसंचार सेवा कंपनी एमटीएस इंडियाने मोबाईल इंटरनेटच्या दरांत जवळपास ३३ टक्क्यांनी घट केल्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयामुळे अन्य कंपन्यांमध्ये दरांत कपात करण्याची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या कंपन्या गेल्या काही काळापासून इंटरनेट दरांत वाढ करत आहेत.एमटीएस इंडियाचे मुख्य विपणन व ब्रँड अधिकारी लियोनिद मुसातोव यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, प्रथमच इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आम्ही डोंगलच्या दरांत ३३ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. एमटीएसने पोस्टपेड ग्राहकांना एम-ब्लेझ अल्ट्रा वायफाय डोंगलची किंमत ९९९ रुपये केली असून यापूर्वी ते १,४९९ रुपयांत उपलब्ध होते. कंपनीच्या दाव्यानुसार, एमटीएसच्या डोंगलची किंमत अन्य कंपन्यांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी आहे. या इंटरनेट सेवांसाठी एमटीएसद्वारे ९.८ मेगावॅट प्रतिसेकंद पर्यंतची ब्रॉडबँड स्पीड दिली जाणार आहे. कंपनीने नव्या ग्राहकांसाठी १० जीबी मोबाईल ब्रॉडबँड असलेले एमब्लेझ अल्ट्रा वायफाय डोंगलच्या किंमत २,२९९ रुपयांवरून १,७४९ रुपये केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)