नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयात मीडियाच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. मीडियाच्या प्रवेशाला चार जानेवारीपासून ही बंदी असणार आहे. विना परवानगी आता अर्थमंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याला भेटता येणार नाही. अर्थसंकल्प अंदाजे २९ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पात आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी जेटली यांच्याकडून उपाययोजना असण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील वृद्धीदर ७.५ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पाची तयारी झाली सुरू
By admin | Updated: December 29, 2015 01:58 IST