नवी दिल्ली : भारतात व्यवसाय करणे सोपे जावे तसेच मेक इन इंडिया मोहिमेला गती मिळावी यासाठी केंद्र सरकार तीन विधेयके आणणार आहे. पुढील आठवड्यात ही विधेयके केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येतील.बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, लघुउद्योग (रोजगार आणि सेवाशर्ती) विधेयक २0१४ आणि कर्मचारी भविष्यनिधी आणि विविध तरतुदी सुधारणा विधेयक अशी ही तीन विधेयके आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनात ही विधेयके मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सत्र ८ मेपर्यंत चालणार आहे. राज्यसभा मात्र १३ मेपर्यंत चालणार आहे. श्रम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या विधेयकांसाठी सरकार शक्य ते प्रयत्न करील. पुढील आठवड्यात ती मंत्रिमंडळासमोर येतील. याच अधिवेशनात ही विधेयके मंजूर होण्याची शक्यता मात्र कमी आहे, असे या अधिकाऱ्याने म्हटले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘मेक इन इंडिया’साठी तीन विधेयकांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 01:05 IST