Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीत ६.७३ टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: June 2, 2014 06:25 IST

साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला

नवी दिल्ली : साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नुकतीच यासंबंधीची आकडेवारी जारी केली आहे. यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांची प्रीमियम मिळकत ८.४१ टक्क्यांनी वाढून ४,६०२.५२ कोटी रुपये झाली. याच काळात खासगी क्षेत्रातील कंपन्यांची मिळकत ४.७७ टक्क्यांच्या वाढीसह ३,८१८.९३ कोटी रुपये राहिली. सार्वजनिक क्षेत्रातील चार साधारण विमा कंपन्यांमध्ये न्यू इंडियाची प्रीमियम मिळकत १३.९४ टक्क्यांनी वाढून १,५४४.४३ कोटी रुपयांवर गेली. (लोकमत न्यूज नेटवर्क)