Join us

स्पर्धा परीक्षापूर्व व सामाईक प्रवेश परीक्षापूर्व प्रशिक्षण

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

नाशिक : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षापूर्व व सामाईक प्रवेशपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून, या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष मनीषा पवार यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक समुदायातील (मुस्लीम, ख्रि›न, शीख, बौद्ध, जैन व पारसी) युवक-युवतींना, शासकीय, निमशासकीय सेवेत अधिकारी पदासाठी संधी उपलब्ध व्हावी म्हणून मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेंतर्गत खासगी प्रशिक्षण संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएसस्सी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएसस्सी), बॅँकिंग सेवा स्पर्धा परीक्षा, सामाईक प्रवेश परीक्षा (मेडिकल, इंजिनिअरिंग, सीईटी, जेईई, एआयपीएमटी), १०वी, १२वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग या संदर्भात मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या युवक-युवतींनी स्पेक्ट्रम ॲकॅडमीद्वारा प्रबोधन बहुउद्देशिय संस्था, विठ्ठल पार्क, गुरांच्या दवाखान्याशेजारी, अशोकस्तंभ, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)