Join us

नॅफस्कॉबच्या संचालकपदी प्रमोद कर्नाड

By admin | Updated: June 9, 2015 23:40 IST

नॅशनल फेडरेशन आॅफ स्टेट को-आॅपरेटिव्ह बँक्स लि. (नॅफस्कॉब) या देशपातळवरील संस्थेवर प्रमोद कर्नाड यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई : नॅशनल फेडरेशन आॅफ स्टेट को-आॅपरेटिव्ह बँक्स लि. (नॅफस्कॉब) या देशपातळवरील संस्थेवर प्रमोद कर्नाड यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. नॅफस्कॉबच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळाच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. प्रमोद कर्नाड हे सध्या महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याचसोबत, कर्नाड हे ख्यातनाम लेखक, कवी व गायक असून त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)