प्रज्ञा - अवकाळीने शेतकर्यांची धावपळ
By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST
वाफगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागाला पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसला आहे. आज येथे काही प्रमाणात पाऊस झाला आहे. अगोदरच शेतकरी पुरता ढासळला आहे. त्यात पुन्हा-पुन्हा होणार्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
प्रज्ञा - अवकाळीने शेतकर्यांची धावपळ
वाफगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागाला पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसला आहे. आज येथे काही प्रमाणात पाऊस झाला आहे. अगोदरच शेतकरी पुरता ढासळला आहे. त्यात पुन्हा-पुन्हा होणार्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या पूर्व भागातील वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, वरूडे, कनेरसर या परिसरात शेतातील कामे सुरू आहेत. गहू काढण्याची शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. बहुतेक शेतकरी कडब्याची आरण लावण्यात मग्न असताना पावसाने शेतकर्यांची धावपळ केली.