Join us

व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता

By admin | Updated: March 29, 2017 03:18 IST

एप्रिल २0१७ मध्ये होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. जाणकारांनी

मुंबई : एप्रिल २0१७ मध्ये होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. जाणकारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. मानक संस्था इकराचे व्यवस्थापकीय संचालक नरेश ठक्कर यांनी सांगितले की, मार्चमध्ये ग्राहक वस्तू किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर निर्धारित लक्ष्याच्या आतच राहील असे दिसते. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात होण्याची शक्यता नाही. महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा पक्का निर्णय पतधोरण आढावा समितीने घेतला आहे. त्यानुसार रेपो दर आहे त्या पातळीवर कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.