मुंबई : पतधोरणाचा आढावा घेताना रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले असले तरी फेब्रुवारीत आगामी आढावा घेताना रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदरात ०.२५ टक्का कपात करू शकते, असा अंदाज बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंचने (बोफा-एमएल) व्यक्त केला आहे. महागाई आटोक्यात येत आहे. सातव्या वेतन आयोगाबाबत काही शंका व्यक्त केल्या जात असल्या तरी पतधोरण ठरविताना काहीही अडचण येणार नाही. आमच्या मते, रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आगामी आढावा घेताना व्याजदरात ०.२५ टक्के कपात करील. सप्टेंबरच्या तिमाहीत वृद्धीदर ७.४ टक्के राहिल्याने रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करून अर्थव्यवस्थेला गती देण्याची शक्यता आहे, असे बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंचने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फेब्रुवारीत व्याजदर कपातीची शक्यता
By admin | Updated: December 3, 2015 02:10 IST