Join us  

देशभरातील बंदरांच्या मालवाहतुकीत १.५२ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:36 AM

देशभरातील प्रमुख बंदरांच्या मालवाहतुकीत एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत १.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई : देशभरातील प्रमुख बंदरांच्या मालवाहतुकीत एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत १.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोचिन बंदराच्या मालवाहतुकीमध्ये सर्वात जास्त १०.२ टक्क्यांची वाढ झाली. तर मुंबई बंदराच्या मालवाहतुकीत नाममात्र ०.३६ टक्के वाढ झाली. कोचिन बंदराची मालवाहतूक ७७ लाख ४३ टनांवरून यंदा ८५ लाख ९ हजार टनांवर गेली आहे. दुसरीकडे मुंबई बंदरातील मालवाहतूक १ कोटी ४८ लाख ७५ हजार टनांवरून यंदा १ कोटी ४९२९ हजार टन झाली.हल्दिया डॉक कॉम्प्लेक्समधून होणाऱ्या मालवाहतुकीमध्ये ७.२० टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये १ कोटी ७ लाख ९१ हजार टन असलेली मालवाहतूक यंदा १ कोटी १५ लाख ६८ हजार टन झाली. दीनदयाल बंदरातून यंदा ३ कोटी ११ लाख २० हजार टन मालवाहतूक झाली. गतवर्षी ही मालवाहतूक २ कोटी ९१ लाख २८ हजार टन होती. ही वाढ ६.८४ टक्के आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरातून गतवर्षी १ कोटी ७३ लाख ६३ हजार टन मालवाहतूक झाली होती. यंदा त्यामध्ये १.५४ टक्क्यांची वाढ झाली व १ कोटी ७६ लाख ३१ हजार टन मालवाहतूक करण्यात आली.>फर्टिलायझरच्या वाहतुकीत घटमुंबई बंदरातून होणाºया फर्टिलायझरच्या वाहतुकीमध्ये यंदा घट झाली आहे. मुंबई बंदरातून या कालावधीत ५९ हजार टन फर्टिलायझरची वाहतूक झाली. गतवर्षी हे प्रमाण ७७ हजार टन होते. क्रुड आॅईलची वाहतूक गतवर्षी ९० लाख ९९ हजार टन झाली होती. यंदा त्यामध्ये घट झाली व ८८ लाख २५ हजार टन वाहतूक करण्यात आली. कोलकाता, हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स, पॅरादीप, विखाशापट्टणम, एन्नौर, चेन्नई, व्ही.ओ. चिदंबरणार, कोचिन, न्यू मेंगलोर, मोर्मुगाव, मुंबई, जे.एन.पी.टी., दीनदयाल या बंदरांत या काळात १७,६८,००७ हजार टन मालवाहतूक करण्यात आली. गतवर्षी हे प्रमाण १७,४१,०६८ हजार टन होते.