Join us  

पोर्टेबल मिनी एसी, ५०० रुपयांत तुमच्या घरी; उन्हाळ्यापूर्वीच करा तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 4:43 PM

बाजारात सध्या पोर्टेबल एसी उपलब्ध झाला असून या पोर्टेबल एसीची किंमत फक्त ५०० रुपये आहे.

थंडीचा महिना आता सरत असून लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होईल. होळीचा सण येताच थंडी पळून जाईल अन् उन्हाळा सुरू होईल, अशी आपली धारणा आहे. त्यानुसार, मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याला सुरुवातही होते. तत्पूवी आपण उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घराच्या भींतींवर नारळाच्या झाडांची पानं, बांबूच्या काटा, तुराडी अशा वस्तू टाकत असतो. कडक उन्हापासून वाचण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. पंख्याची हवा गरम येते, म्हणून आपण कुलरची सोय करतो. पण, कुलर घेतल्यानंतरही प्रत्येकाला एसी हवाहवासा वाटतो. आता, गरिबांचा एसी म्हणून थंड हवा देणारा केवळ ५०० रुपयांतील एसी उपलब्ध झाला आहे.  

बाजारात सध्या पोर्टेबल एसी उपलब्ध झाला असून या पोर्टेबल एसीची किंमत फक्त ५०० रुपये आहे. अनेकांनी याला पसंती दर्शवली असून आतापासूनच खरेदी करण्यास सुरुवातही केली आहे. हा एसी तुम्हाला फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येईल. Portable Mini AC USB Battery Operated Air Conditioner ची फ्लिपकार्टवरील किंमत ६९९ रुपये आहे. मात्र, २९ टक्के डिस्काउंट मिळत असल्याने तुम्हाला सध्या तो केवळ ४९९ रुपयांमध्ये विकत मिळत आहे. विशेष म्हणजे कंपनीने १० दिवसाची रिप्लेसमेंट गॅरंटीही दिली. लहान रुम, ऑफिस किंवा वन बेडसाठी हा एसी उपयुक्त ठरू शकतो.

मिनी एसी कुलर

SPYNET Mini AC Cooler डिजाइन म्हणून खूप जबरदस्त आहे. याची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. तुम्हाला यावर ६५ टक्के डिस्काउंट मिळेल. त्यामुळे तो ६९९ रुपये किंमतीत खरेदी करता येईल. तुम्ही Kitchen आणि Outdoor मध्ये हा फिट करू शकता. यात ३ इन १ फंक्शन मिळतात. हे हवेला क्लीन करतात. सोबत कूलिंगवरून काहीच त्रास होत नाही.

टॅग्स :समर स्पेशलफ्लिपकार्टबाजार