Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शिक्षक संघा उपाध्यक्षपदी पोपट पाटील

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

नवे पारगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पोपट रघुनाथ पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

नवे पारगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पोपट रघुनाथ पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.
सन २०१४ ते २०१७ साठी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी निवडीसंबंधीची सभा झाली. राज्यसंघाचे नेते संभाजीराव थोरात अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.
पोपट पाटील गेली सहा वर्षे राज्यसंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. त्यांना उपनेते एन. वाय. पाटील, मोहन भोसले, राज्यसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब तांबारे, आप्पासाहेब कूल, कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरे, एस. व्ही. पाटील, सुनील पाटील, अरुण चाळके यांचे सहकार्य लाभले.
-------------
फोटो सिंगल
०१ पोपट पाटील