Join us

"गरीब" भारतीयांनी स्नॅपचॅटला शिकवला धडा

By admin | Updated: April 16, 2017 18:45 IST

आपले अॅप गरीब भारतीयांसाठी नाही, असे सांगून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या स्नॅपचॅटला भारतीयांनी धडा शिकवला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - आपले अॅप गरीब भारतीयांसाठी नाही, असे सांगून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या स्नॅपचॅटला भारतीयांनी धडा शिकवला आहे. स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी भारतीयांबाबत अनुदगार काढल्याच्या दुसऱ्या दिवशी अॅप स्टोअरवर स्नॅपचॅटच्यी रेटिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे.  आज सकाळपासूनच ट्विटर आणि फेसबूकवर #boycottsnapchat  आणि #Uninstallsapchat हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. 
भारतात व्यवसाय वाढवण्यासंबंधी विचारणाऱ्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इव्हान स्पीगल यांनी आपले अॅप भारतासारख्या गरीब देशासाठी नाही, असे म्हटले होते. त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. अनेकांनी इव्हान यांच्या वक्तव्यावर टीका करत हे अॅप अनइन्स्टॉल करण्यास सुरुवात केली होती. तसेच ह्या अॅपला वाईट रेटिंग देण्यासही सुरुवात झाली होती. त्यामुळे गुहल स्टोअरवर स्नॅपचॅटची माहिती पाहिल्यास त्यावर या अॅपच्या सध्याच्या व्हर्जनची रेटिंग सिंगल स्टार (6099 रेटिंग्जनुसार) दिसत होती. रविवारी सकाळपर्यंत स्नॅपचॅटच्या सर्व व्हर्जनची रेटिंग दीड स्टार (9 हजार 527 रेटिंग्जनुसार) दिसत होती. तर या अॅपची एकंदरीत रेटिंग चार स्टार आहे, ही रेटिंग 1 कोटी 19 लाख 32 हजार 996 रेटिंग्जवर आधारित आहे.  
भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ  इवान स्पीगल यांचा भारतात बिझनेस वाढवण्याचा विचार नाही आहे.  भारत खूप गरीब देश आहे आणि आमचे अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आले आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.