Join us

राजकीय वृत्त - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

साथ देणार्‍यास लाथ मारणार्‍यांवर विश्वास कसा ठेवणार

साथ देणार्‍यास लाथ मारणार्‍यांवर विश्वास कसा ठेवणार
उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन
मुंबई- भाजपाच्या वाईट काळात आम्ही त्यांना साथ दिली. मात्र आता अच्छे दिन आले म्हटल्यावर त्यांनी आपल्या गेल्या २५ वर्षांच्या मित्राची साथ सोडली. साथ देणार्‍यांना लाथ देणार्‍या अशा लोकांवर तुम्ही विश्वास कसा ठेवणार, असा भावनिक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित न करता प्रथमच बोरीवली येथे आयोजित केला होता. तत्पूर्वी शिवाजी पार्क येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आले. ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपाला साथ दिली. परंतु त्यांनी आम्हाला लाथ मारली. भाजपाचे हे युती तोडणे महाराष्ट्रातील हिंदूना आवडलेले नाही. त्यामुळेच अनेकजण भेटून भाजपाच्या या कृतीबद्दल नाराजी प्रकट आहेत.
मुंबईतील गुजराती, जैन व मारवाडी समाजाने शिवसेनेखेरीज मुंबईचा विचार करून पाहावे, कारण जेव्हा तुमच्यावर संकट आले तेव्हा ही शिवसेना तुमच्या पाठिशी उभी राहिली होती, असे ठाकरे म्हणाले.
माझ्यासमोर बसलेला शिवसैनिक हीच माझी शस्त्रे आहेत, नागरिकांच्या मनातील संताप हेच भांडवल आहे, असे नमूद करून ठाकरे म्हणाले की, आम्ही रिजनल पार्टी असलो तरी ओरिजनल आहोत. त्यामुळे राज्यात आमचीच सत्ता येईल. सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करु. २०२० चा भारत युवकांचा असेल असे पंतप्रधान सांगतात आणि आदित्य ठाकरे या युवकाला चर्चेला पाठवले तर भाजपाचा अहंकार दुखवतो ही दुटप्पी भूमिका आहे, असेही ठाकरे म्हणाले.