नवी दिल्ली : पवन ऊर्जा क्षमतेचा अनुकूल वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार धोरण आणणार आहे. यात आधी चालू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांची क्षमता वाढवून किमान एक मेगावॅट करण्यासाठी व्याजात .०२५ टक्के सूट दिली जाईल.नवीन आणि नवीनिकरण ऊर्जा मंत्रालयाने पवन ऊर्जा प्रकल्प सक्षम करण्यासाठीचा मसुदा जारी केला आहे. यावर संबंधितांकडून १४ मार्चपर्यंत अभिप्राय मागविण्यात आले आहेत.मसुद्यानुसार पवन ऊर्जा प्रकल्प सक्षम करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून पवन ऊर्जा संसाधनांचा योग्य वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. २००० पर्यंत स्थापन करण्यात आलेल्या पवन चक्कींची क्षमता ५०० किलोवॅट किंवा त्यापेक्षा कमी आहे, तसेच जेथे हे प्रकल्प आहेत, त्याच ठिकाणी पवन ऊर्जा क्षमता जास्त आहे. ५०० किलोवॅट किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या प्रकल्पांची एकूण क्षमता ३ हजार मेगावॅटपेक्षा अधिक आहे, असा अंदाज आहे.
पवन ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण
By admin | Updated: March 8, 2016 21:42 IST